स्थायी समिती सभापती पदासाठी संतोष लोंढे यांचा अर्ज दाखल

पिंपरी : पिंपरी चिंचवड महाालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी सत्ताधारी भाजपकडून नगरसेवक संतोष लोंढे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. नगरसचिव उल्हास जगताप यांनी हा अर्ज स्वीकारला. यावेळी, महापौर माई उर्फ उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे, माजी महापौर राहुल जाधव, नगरसेवक संतोष लोंढे यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.